भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, युवकाचा मृत्यू
माहुली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

मोर्शी /6 नोव्हेंबर : माहुली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमरावती मोर्शी रोडवरील नांदगाव पेठ समोरील चिचखेड गावाच्या फाट्याजवळ भरधाव ट्रक क्रमांक एम पी 19 एच ए 5324 ने मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील युवक रोशन ढोले याच्या दुचाकी ला जबर धडक दिल्याने तो जागी मृत्युमुखी पडला. रोशन हा रात्री नऊ वाजताच्या सुमा रास अमरावती येथून खानापूर ला आपल्या गावी येत असताना दूचा कीला जोरदार धडक दिल्याने रोशन राजेंद्र ढोले वय 35 वर्ष रा. कानफाडे पुरा, खानापूर ता मोर्शी हा मोटर सायकलस्वार युवक घटनास्थळी ठार झाला. सदरची घटना माऊली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली याबाबतची माहिती माहुली पोलिसांना कळताच पोलिसांनी मृतक रोशन ढोले याला शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास माऊली पोलीस करीत आहे. मृतक रोशनच्या मागे पत्नी, लहान मुलगा व आई वडील असल्याचे कळते.




