राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप

नवी दिल्ली/28 ऑक्टोबर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच 29 ऑक्टोबर 2025 रोजी हरियाणातील अंबाला हवाई दल तळावर भेट देणार आहेत. ही भेट अत्यंत विशेष ठरणार आहे, कारण त्या भारतातील सर्वात अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानात उड्डाण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या या ऐतिहासिक उड्डाणाकडे भारतीय हवाई दलासाठी अभिमानाचा क्षण आणि देशातील महिलांसाठी प्रेरणादायी पाऊल म्हणून पाहिले जात आहे. यापूर्वी, 8 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर हवाई तळावरून सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानात उड्डाण केले होते. त्या वेळी त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्याचे कौतुक करत सांगितले होते की हे उड्डाण केवळ रोमांचक नाही, तर आपल्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचे प्रतीक आहे. जवळपास दोन वर्षांनंतर त्या पुन्हा लढाऊ विमानात उड्डाण करणार असून, या वेळी त्या राफेलमध्ये असतील, जे भारताच्या संरक्षण क्षमतेचे सर्वोत्तम प्रतीक मानले जाते.

संबंधित बातम्या

Back to top button