पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ
उपराष्ट्रपतींकडून पार्थ पवारांना शुभेच्छा

नवी दिल्ली/9 एप्रिल : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले. अशामध्ये त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. त्यांनी गुरुवारी (9 एप्रिल) राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार यांच्या जॅकेटने आणि शपथ घेण्याच्या शैलीने सर्वांचेच लक्ष वेधले.
शपथविधीच्या वेळी पार्थ पवार यांनी परिधान केलेले जॅकेट हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास शैलीची आठवण करून देणारे होते. दिवंगत अजित पवार यांची साधी, पण प्रभावी शैलीची नेहमीच चर्चा असतं. त्याप्रमाणे आता पार्थ पवार यांचीही चर्चा सुरु झाली आहे. शपथविधीवेळी पार्थ पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते. यावेळी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. तसेच, त्यांनी अजितदादांचा चष्मादेखील घातला होता. यावेळी, त्यांच्या शैलीने सर्वांनाच अजित पवार यांची आठवण झाली. राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.




