एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

भाजप-जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढतील

* बिहार निवडणुकीच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली/12 ऑक्टोबर – आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएचा सीट शेअरींग फॉर्म्युला निश्चित झाला आहे. प्रदीर्घ बैठकांनंतर आणि चर्चांनंतर भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवतील. एकूण 243 जागांच्या बिहार विधानसभेत लोजपा 29, आरएमएमला 6 आणि एचएएमला 6 जागा मिळाल्या आहेत. नवी दिल्लीतील मॅराथॉन बैठकींनंतर सर्व सहयोगी पक्षांना समाधानकारक जागावाटप करण्यात एनडीएला यश मिळाले आहे. या जागावाटपानंतर बिहारमध्ये ‘मोठा भाऊ, छोटा भाऊ’ समीकरण पूर्ण झाल्याचे दिसते. या बैठका सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्याचे लोजपाचे नेते खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करून सांगितले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पाचही पक्षांच्या जागावाटपाची सविस्तर माहिती दिली असून, त्यानंतर ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. त्यांनी ट्विटमध्ये सर्व बिहारी जनता एनडीए सरकारच्या सोबत असल्याचेही सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button