ऐतिहासिक जंतरमंतरला आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळले

केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली/12 ऑक्टोबर  : देशाची राजधानी दिल्ली येथील आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले जंतरमंतर हे मैदान आता कोणत्याही आंदोलनासाठी वापरत येणार नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी अधिकृत सूचना जारी केली आहे. या मैदानावर अनेक ऐतिहासिक धरणे – आंदोलने झाली असून नुकतेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे हे मैदान चर्चेत आले होते. जंतर-मंतर वगळले असले तरीही त्याऐवजी तीन नवीन जागांचे पर्याय देण्यात आले आहेत. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान या तीन ठिकाणी आता आंदोलन करता येणार आहे.
नागरिकांना आंदोलन आणि निदर्शने करण्याचा अधिकार आहे. पण, त्यासाठी योग्य पर्यायी ठिकाणे निश्चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींच्या आधारे आंदोलनाच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस आयुक्तअनुराग कुमार यांनी अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यानुसार, जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे निश्चित ठिकाण आता रद्द करण्यात आले आहे.
जंतरमंतर हे मैदान नवी दिल्लीच्या ल्युटियन्स परिसरात आहे. ते कॅनॉट प्लेसपासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे. संसद भवनदेखील जंतरमंतरपासून 500 मीटर अंतरावर आहे. हे स्थळ एका संवेदनशील भागात असल्यामुळे याठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था आहे. जंतरमंतर एकेकाळी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक होते. याठिकाणी शंख विज्ञानावरील संशोधनासाठी वापरले जात असे.

Back to top button