मतदार यादीचा डिजिटल डेटा राजकीय पक्षांना देणार!
निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्राची मतदार यादी राजकीय पक्षांसोबत शेअर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निर्णयाला ’पहिले पाऊल चांगले’ म्हटले आहे, परंतु त्याच वेळी हा डेटा कधी आणि कोणत्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जाईल हे आयोगाने स्पष्ट करावे अशी मागणीही केली आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले की, मतदार यादी सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा एक चांगला पहिला टप्पा आहे. हा डेटा डिजिटल आणि मशीनरीड केबल फॉरमॅटमध्ये (जसे की एक्सेल किंवा सीएसव्ही) कोणत्या तारखेपर्यंत उपलब्ध होईल हे आयोग स्पष्ट करू शकेल का? त्यांनी या पोस्टसोबत एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या ओशासनानुसार 2009 ते 2024 पर्यंत हरियाणा आणि महाराष्ट्राची मतदार यादी शेअर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष बर्याच काळापासून अशी मागणी करत आहेत की मतदार यादी केवळ स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपातच नाही तर अशा डेटा स्वरूपात (जसे की एक्सेल, सीएसव्ही इ.) उपलब्ध करून दिली पाहिजे ज्यामुळे तिचे विश्लेषण करणे, अनियमितता ओळखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे शक्य होईल