ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांच्याकडून प्रमोद पोकळे गुरुजींचे कौतुक

मुंबईतील ‘सत्संग प्रेमाचा’ कार्यक्रमात भजन सादरीकरण

अमरावती /17 नोव्हेंबर  : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक तथा संगीतकार पंडित अजित कडकडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित ‘सत्संग प्रेमाचा : 2026’ या कार्यक्रमात बडनेरा येथील दूरदर्शन व आकाशवाणी लोककलावंत प्रमोद पोकळे गुरुजी यांनी आपल्या सुमधुर भजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या प्रभावी गायनाने प्रभावित होऊन स्वतः पंडित अजित कडकडे यांनी पोकळे गुरुजी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा विशेष गुणगौरव केला. पंडित अजित कडकडे फॅमिली ग्रुपच्या वतीने रॉयल हिल रिसॉर्ट, मुंबई येथील सभागृहात 14 व 15 नोव्हेंबर 2026 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button