दोन बसची जोरदार धडक; 11 जणांचा जागीच मृत्यू

20 हून अधिक जण जखमी

* थरकाप उडवणार्‍या अपघातात बसचा चक्काचूर

तामिळनाडू/30 नोव्हेंबर : आज तामिळनाडूतील काराईकुडीजवळ दोन सरकारी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तब्बल 11 जाणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी झालेल्या या अपघातात दोन राज्य परिवहन बस एकमेकांवर धडकल्या असून 11 मृत्यूंसह 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातात एका बसचे खूप नुकसान झाले असून, सोशल मिडियावर थरारक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. जिल्हा पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पीटीआयशी बोलताना सांगितले की हा अपघात काराईकुडीपासून सुमारे 15 किमी अंतरावर झाला. 11 ही मृतांची संख्या घटनास्थळीच झाली असून त्यात आठ महिला, दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. पोलिस अधिकार्‍यामनी दिलेल्या माहितीनुसार, 20 हून अधिक प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात घडला असून, धडकेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे.

संबंधित बातम्या

Back to top button