देशासोबत विश्वासघात, पंजाबमध्ये यूट्यूबरला बेड्या
गद्दार ‘ज्योती’सोबत निघालं कनेक्शन

नवी दिल्ली/ 4 जून : देशासोबत विश्वासघात करणार्या पंजाबमधील यू-ट्यूबर जसबीर सिंह याला बेड्या ठोकल्या आहेत. पंजाबमधील स्पेशल ऑपरेशन सेलने जसबीर सिंह याला मोहालीमधील रूपनगर गावातून अटक केली. आरोपी जसबीर हा ‘जान महल’ नावाचा एक यूट्यूब चॅनल चालवतो, त्याचे एक मिलियनपेक्षा जास्त ऑलोअर्स आहेत. जसबीर सिंह याला संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखील अटक करण्यात आले आहे. जसबीर सिंह याचे कनेक्शन गद्दार ज्योती म्हलोत्रा हिच्यासोबत निघाले आहेत. जसबीर आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याचेही तपासातून समोर आले आहे.
जसबीर सिंह याचं कनेक्शन पीआयओ शाकिर उर्फ जट्ट रंधावा याच्यासोबत असल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपी हा दहशतवाद्यांना पाठिंबा देणार्या हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे. जसबीरने हरियाणातून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या यूट्यूबर ज्योति मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक तसेच पाक उच्चायोग अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशीही संपर्क ठेवला होता. सूतरांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हरियाणामधील हिसारमधून अटक केलेल्या ज्योती मल्होत्रा हिच्या चौकशीमध्ये आरोपी जसबीर याचं नाव समोर आले आहे. जसबीर हा आरोपी ज्योती मल्होत्रासोबत संपर्कात होता. त्यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाली.
ज्योति मल्होत्रा याच्यामार्फतच आरोपी जसबीर हा पाक उच्चायुक्ताचा निष्कासित अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात आला होता. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या मोबाइलमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. जसबीरच्या फोनमध्ये काही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या लोकांचे नंबरही आढळले आहेत. हे नंबर त्याने वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले होते. जसबीर सिंह हा तीन वेळा पाकिस्तानला गेल्याचं तपासात समोर आले आहे. जसबीर हा दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत झालेल्या पाकिस्तान नॅशनल डे कार्यक्रमात सहभागी झाला होता. जसबीर 3 वेळा (2020, 2021, 2024) पाकिस्तानला देखील गेला होता. त्याच्या मोबाइल फोनमधून पाकिस्तानशी संबंधित अनेक संपर्क क्रमांक मिळाले आहेत.