स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तरुणांना प्राधान्य

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य सं स्थांच्या निव डणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्व भूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला गती दिली आहे. आता भाजपने देखील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून, निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे यामुळे दिसू लागली आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात तरुणांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप 35 वर्षांखालील तरुणांना कमीत कमी 40 टक्के तिकिटे देणार आहे. युवाशक्तीवरचा विश्वास आणि पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दिशेने हा मोठा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




