पीएम मोदींचा ग्लोबल लीडरमध्ये अव्वल

नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक प्रियता दिवसें दिवस वाढत आहे. त्यांच्या नेतृत्वा मुळे त्यांना जगभरात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या नवीनतम ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग यादीत ते अव्वल स्थानावर आहेत. ही यादी 6 ते 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालात असे म्हटले आहे की हे रेटिंग देशातील प्रौढांच्या गेल्या सात दिवसांच्या सर्वेक्षणातील साध्या मूव्हिंग सरासरीचे प्रतिबिंबित करते. या अहवालानुसार, पंतप्रधान मोदींचे अप्रुव्हल रेटिंग 71 टक्के आहे. त्यांच्यानंतर जपानचे पंतप्रधान साने ताकाची आहेत, ज्यांना सर्वेक्षण केलेल्या लोकांकडून 63 टक्के मान्यता मिळाली. दक्षिण कोरियाचे ली जे-म्युंग 58 टक्के मान्यता रेटिंगसह तिसर्‍या स्थानावर आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button