प्रफुल्ल पटेलांनी पैशांच्या भरोशावर निवडणुका जिंकल्या

मुंबई – निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मतं जिथं मारायची तिथेचं मारतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रे सचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडार्‍यात केलं होतं. त्यांच्य या टीकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल पटेलांनी आजपर्यंत पैशाच्याचं भरोशावर राजकारण केलं आणि निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही ते असंच करणार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य खर्‍या अर्थानं हास्यास्पद आहे. प्रफुल्ल भाईंनी आमचे स्नेही नरेंद्र भोंडेकर यांच्यावरचं वक्तव्य केलं असावं असं मला वाटतंय असे नाना पटोले म्हणाले. त्यामुळं प्रफुल्ल भाईंनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलेलं आहे. त्या स्टेटमेंटला त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुकीत लोकं पैसे घेतात आणि मतं जिथं मारायची तिथेचं मारतात.

संबंधित बातम्या

Back to top button