32 कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा होता कट

बॉम्ब स्फोटांचा मुख्य सुत्रधाराची ओळख पटली

* मुजम्मिल गनईच्या चौकशीदरम्यान तुर्की कनेक्शन समोर

* अनेक ठिकाणी साखळी हल्ल्यांचा होता प्रयत्न

नवी दिल्ली/13 नोव्हेंबर – लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला. पोलीस सूत्रांच्या मते दहशतवादी 6 डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या कट होता.
या हल्ल्यांसाठी त्यांनी 32 गाड्यांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवणार होते. या गाड्यांमध्ये ब्रेजा, स्विफ्ट डिजायर, इकोस्पोर्ट आणि आय20 अशा अनेक मॉडेल्सचा समावेश होता. दरम्यान आतापर्यंत तपास संस्थांना चार गाड्या सापडल्या आहेत. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आणि जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद- सहारापूर मॉड्यूलच्या तपासात महत्त्वाचे खुलासे झालेत. दिल्ली बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड म्हणून अबू उकासा (कोड नेम) याचे नाव समोर आलंय. स्फोटात वापरण्यात आलेल्या ह्युंदाई आय20 कारचा चालक मोहम्मद उमर हा तुर्कीमधील अंकारातील उकासाच्या संपर्कात होता. उकासा हा मोहम्मद उमर आणि मुजम्मिल शकीलचा हँडलर असल्याचे सांगितले जात आहे. तर हे दहशतवादी 32कारच्या सहाय्याने अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. सुरक्षा यंत्रणेला संशय येऊ नये म्हणून डॉक्टर मुजम्मिलने वर्ष 2022 मध्ये हॅण्डलरला भेटण्यासाठी तुर्की देश निवडला होता. मुजम्मिल आणि उमर यांचे ब्रेनवॉश येथेच करण्यात आले होते. अबू उकासा हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक आहे. सुरुवातीला या हँडलरने व्हॉट्सअ‍ॅपवरून मुजम्मिलनशी संपर्क करत असायचा. पण नंतर दोघेही सेशन अ‍ॅपद्वारे बोलू लागले, जेणेकरून त्यांचे संभाषण लीक होऊ नये आणि एजन्सींना त्याची माहिती मिळू नये.

मसूद अझहरच्या ग्रुपच्या संपर्कात

दिल्लीत स्फोट घडवणार्‍या डॉक्टरांचा हा हायब्रिड दहशतवादी मॉड्यूल उमर बिन खिताब आणि फरजान दारुल उलूम या दोन टेलिग्राम गटांशी जोडलेला होता. हे ग्रुप जैश-ए-मोहम्मदचे होते कारण या ग्रुपमध्ये जैश आणि मौलाना मसूद अझहर यांचे जुने विधानं, पत्रे आणि जिहादला भडकावणारी दहशतवाद समर्थक पोस्ट यात व्हायरल करण्यात येत होते, असा संशय गुप्तचर विभागाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button