मनोज जरांगे पाटील यांच्या हत्त्येसाठी अडीच कोटींची सुपारी
कट रचणारे दोन संशयित ताब्यात

* मोठ्या राजकीय नेत्याचे नाव चर्चेत
* राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
जालना/6 नोव्हेंबर -मागील तीन वर्षांपासून घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. कित्तेक आंदोलन, आमरण उपोषण, रास्ता रोको करत थेट मुंबई गाठून आरक्षण त्यांनी पदरात पाडून घेतलं. मात्र, याच धाडसी योध्दाला म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेनं बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची नावं अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या कॅमेरासमोर न येता जालना पोलिसांनी माहिती दिली आहे की, प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, परळीतील एका नेत्याने काही कोटी रुपयांची ऑफर देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणानंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय..संशयितांची कसून चौकशी करण्यात येतेय.. मात्र जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट कोणत्या उद्देशाने रचण्यात आला? जरांगेंना जीवे मारण्यासाठी कोट्यवधीची सुपारी देणारा बडा नेता कोण? या मागे आरक्षणाचा मुद्दा आहे की आणखी काही? या सगळ्यांची चौकशी करण्याची गरज आहे.




