अधिकार्‍यांच्या नव्हे तर आमदार-खासदारांच्या गाड्या फोडा

प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई/29 ऑक्टोबर – शेतकर्‍यांच्या तसेच बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनकर्त्यांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सध्या नागपुरात शेतकर्‍यांनी मोर्चा काढला आहे. तर, दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अधिका र्‍यांच्या गाड्या फोड ण्यापेक्षा आमदार आणि खासदारांच्या गाड्या फोडा तरच तुम्हाला न्याय मिळेल, असे आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या मागण्यांसाठी तो अशा राजकीय पक्षांवर अवलंबून आहे, ज्यांनी शेतकर्‍यांचे वाटोळे केले आहे. माझे शेतकर्‍यांना आवाहन आहे, शेतकर्‍यांनी जखम एकीकडे, मलम दुसरीकडे असे करू नये. गाड्या फोडायच्या असतील तर सत्तेतील पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सत्तेतील आमदार तसेच खासदारांच्या गाड्या फोड्या! तर तुम्हाला न्याय मिळेल. असे विधान केले आहे. अधिकारी फक्त निर्णयांची अंमलबजावणी करतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य करून काहीही साध्य होणार नाही, असेही ते म्हणाले. नेपाळ आणि लडाखमधील आंदोलनांचा दाखला देत, महाराष्ट्रातील तरुणांनी तसे केल्यास परिस्थिती सुधारेल आणि त्यांना रोजगार मिळेल, असेही आंबेडकर यांनी सूचित केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचेही तेच आवाहन-हिंगोली जिल्ह्यात एका सभेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, पंजाब राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्या ठिकाणी शासनाने हेक्टरी भरीव मदत केली आहे. मात्र त्या तुलनेत महाराष्ट्रात फक्त 8500 रुपयांची मदत करण्यात आली आहे. सदर तुटपुंजी मदत शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून अधिकार्‍यांच्या वाहनांची तोडफोड करून संताप व्यक्त केला जात आहे. पण, अधिकारी हे सत्ताधार्‍यांच्या आदेशानुसार काम करतात. त्यामुळे अधिकार्‍यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा सत्ताधार्‍यांच्या गाड्या फोडल्या तरच आपल्याला वाढीव मदत मंजूर होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

Back to top button