ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी

नवी दिल्ली : डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणावर आता लोकसभेत विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या डॉक्टर तरुणीने स्वत:चे जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिलेले होते आणि गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी निलंबित पोलिस उपनिरीक्षक (PSI) आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर लोकसभेत विरोधी पक्षनेते तसेच खासदार राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत.




