भाजप खा.राजू बिस्ता यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला

राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली/18 ऑक्टोबर – भाजप खासदार राजू बिस्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी त्यांच्या दार्जिलिंगच्या ताफ्यावर हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार राजू बिस्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हल्ल्याची माहिती दिली आणि काही कारवर केलेल्या हल्ल्याचे फोटो देखील शेअर केले. हल्ल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घटनास्थळी पोहोचले. भाजप खासदार राजू बिस्ता यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “आज पश्चिम बंगालच्या मसधुरातील सुखिया पोखरीजवळ माझ्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केला. मी बसलेल्या मागच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला. मतदारसंघातील शांतता भंग करण्यासाठी हल्ला केल्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे म्हणाले की, “कोलकातामधील लोक विचार करत असतील, आम्ही घाबरून जाऊ; परंतु आम्ही घाबरणारे नाही. लपून छपून हल्ला करणार्‍यांमुळे आम्हाला आणखी लढण्याची शक्ती मिळते.”

संबंधित बातम्या

Back to top button