राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा

खा.अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात निदर्शने

* जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

अमरावती /8 ऑक्टोबर : शिवसेना उबाठाच्या आक्रोष मोर्चाचे नेतृत्व करत पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख आणि खासदार अरविंद सावंत यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली. मंगळवारी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजला अपूर्ण म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ कर्जमाफीची मागणी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. खासदार अरविंद सावंत यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले, ज्यामध्ये प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत, तात्काळ पीक विमा आणि शाळा-महाविद्यालयीन शुल्क माफ करावे अशा मागण्यांचा समावेश होता.

या वेळी आमदार गजानन लवटे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे, उपजिल्हाप्रमुख राजेश शर्मा, ओमप्रकाश दिक्षित, माजी नगराध्यक्ष नरेंद्र फिस्के, आशीष वाटाणे, शैलेश पांडे, रोशन जैसिंगपुरे, देवेंद्र औतकर, छोटू ठाकरे, अनिल सायंके, सरपंच सुरेश काकडे, वाघमारे, दीपक भडके, रमेश बोंडे, चक्रधर पेटे, शंकर भेटाळू, मनीष राठी, रामकिसन राठोड, कुशल, सुखदेव ठोंबरे, अनिकेत राउत, कमलेश पवार, रामदास हागे, बंडू केचे, दीपक साखरकर, तुकाराम राठोड, विभा मांडवगडे, निर्मला कौंडण्यपुरे, दुर्गा राठोड, रूक्मा राठोड, किसनाबाई, निता मोहने, प्रवीण भेटालु, शांता मोहने, विक्रम फुकट, ऋषिकेश रडके, पांडुरंग बाबडे, सुर्यकांता कुर्‍हाळे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button