सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संविधानावर घाला
पंतप्रधान मोदींकडून सीजेई गवई यांच्या संयमाचे कौतुक

नवी दिल्ली/6 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावरील निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी संवाद साधला आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले. सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीयाला संताप निर्माण झाला असून, अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संताप निर्माण झाला आहे. अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही. हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे.” यावेळी पंतप्रधान मोदी यांनी असेही सांगितले की, सरन्याधीश गवई यांनी कठीण परिस्थितीत संयम दाखवला.
त्याचबरोबर, न्याय विभागाने एकनाथ शिंदे पूजेला येतील अशी माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कार्तिकी एकादशी येत्या 1 नोव्हेंबरला आहे. या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आचारसंहिता लागू असल्यास निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली जाईल. निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची पूजा पार पडेल.




