‘ते’ 1 लाख 84 हजार कोटी रुपये कुणाचे?

केंद्र सरकारकडून ‘आपले पैसे, आपला हक्क’ अभियान सुरू

नवी दिल्ली/5 ऑक्टोबर : तुम्हाला माहित आहे का, तुमचे पैसे कुठे आहेत? तुमचे किती बँक खाते आहेत किंवा इतरत्र पैसे असल्याची तुम्हाला माहिती आहे का? जर नाही, तर लवकरच शोध घेणे आवश्यक आहे कारण कोट्यवधी रुपये जे पडून आहेत त्यात तुमचेही पैसे असू शकतात. याचा सार एकच आहे की केंद्र सरकारने आता ‘आपले पैसे, आपला हक्क’ अभियान सुरू केले आहे. देशातील आर्थिक संस्थांमध्ये म्हणजेच बँका, इतर वित्तसंस्था, नियामक संस्था, विमा, भविष्यनिर्वाह निधी आदींकडे तब्बल 1 लाख 84 हजार कोटी रुपये पडून आहेत. पडून आहेत म्हणजे हा पैसा बिनदाव्याचा आहे. ही रक्कम वर्षानुवर्षे अशा प्रकारे खात्यात पडून असल्यामुळे केंद्र सरकारने आता ‘आपले पैसे, आपला हक्क’ अभियान सुरू केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला अहमदाबादमध्ये सुरुवात करण्यात आली.

 

संबंधित बातम्या

Back to top button