चकमकीत तीन नक्षलवादी ठार
कांकेर-गरियाबंद सीमेवर गोळीबार

कांकेर /28 सप्टेंबर – छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, कांकेर आणि गरियाबंद येथील पोलिस पथके आणि डीआरजी जवान या चकमकीत सहभागी होते. कांकेर आणि गरियाबंद जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक झाली असून जंगलात ही चकमक घडली, असे पोलिस अधिकार्यांनी नमूद केले. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने सकाळी नक्षलविरोधी कारवाई सुरू केली होती, ज्यात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) कर्मचारी तसेच कांकेर आणि गरियाबंद येथील राज्य पोलिसांचे पथक सहभागी होते. अधिकार्यांनी सांगितले की, अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये माओवादी क्षेत्र समितीचे सदस्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.




