सरकारी वकिलाचा आत्महत्या प्रकरणी न्यायाधीशावर गुन्हा

बीड कोर्टातील धक्कादायक घटना

बीड / 22 ऑगस्ट : बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात दोन दिवसांपूर्वी सरकारी वकील विनायक चंदेल यांनी कोर्टातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात मोठी उलथापालथ झाली असून आता थेट न्यायाधीशावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक चंदेल यांच्या मुलगा विश्वजीत चंदेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे न्यायाधीश रफीक शेख तसेच एका कर्मचार्‍यावर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीशावर गुन्हा दाखल होण्याची ही अभूतपूर्व घटना असल्याने संपूर्ण न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सरकारी वकीलाने थेट न्यायालयाच्या खिडकीला दोरी बांधून आपले जीवन संपवल्याने अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. चंदेल परिवाराने पोलिस व न्यायालयीन प्रणालीकडून न्याय मिळवण्याची ठाम मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असे विधान कुटुंबीयांनी मांडले आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्हा तसेच राज्यातील न्यायालयीन व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पुढील चौकशीचे निकाल संपूर्ण राज्यात लक्ष वेधून घेणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button