फार्मर आयडी’ अत्यल्प दरात मिळणार
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

दर्यापूर/26 मे-शेतकर्यांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, शेतकर्यांना अत्यंत महत्त्वाची असणारीफार्मरआयडी’ (ऋरीाशी खऊ) मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती समितीचे सभापती मा. श्री. सुनील पाटील गावंडे यांनी दिली असून, हे कार्य लवकरच तालुक्यातील शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.शासनाने 15 एप्रिल 2025 पासून फार्मर आयडी अनिवार्य केले असून, ही ओळख शेतकर्यांसाठी अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने याआधीही विनामूल्य पीक विमा काढून देण्यासारख्या उपयुक्त उपक्रमांद्वारे शेतकर्यांच्या विश्वासास पात्रता मिळवली आहे आणि आता पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.फार्मर आयडी ही शेतकर्यांची डिजिटल ओळख असून, ती विविध योजनांमध्ये थेट लाभ मिळवण्यासाठी वापरली जाते. यामुळे लाभाची प्रक्रिया पारदर्शक व सोपी होते. याशिवाय, ही आयडी नसल्यास पुढे खालील योजनांचा लाभ घेता येणार नाही:प्रधानमंत्री किसान सन्माननिधीयोजन(झच-घखडअछ)पीक विमा योजना
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई कृषी अनुदाने (खत, बियाणे, अवजारे) पीक कर्ज, सूट दरातील कर्ज योजन राज्य व केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनातर या नोंदणी करिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत,आधार कार्ड (मोबाईल क्रमांक लिंक असलेला)2. 7/12 उतारा किंवा 8 अ उतारा3. बँक खाते पासबुक (आधारशी लिंक केलेले) 4 पासपोर्ट साईज फोटो दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ना नफा ना तोटा या तत्वा अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या अल्पदरात करण्यात येणार असून, शेतकर्यांनी आवश्यक कागदपत्रांसह समितीकडे संपर्क साधावा. यासाठी बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालय येथे सकाळी 11 वाजता या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकर्यांनी ही संधी न चुकवता आपली फार्मर आयडी बनवून घ्यावी, असे आवाहन सभापती श्री. सुनिल पाटील गावंडे यांनी केले आहे.