हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
वाहनधारकांना मोठा दिलासा

मुंबई /14 ऑगस्ट – देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना 1 एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. त्यात अशा नंबर प्लेट जुन्या वाहनांना बसवण्यासाठी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने आता कडठझ प्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (कडठझ) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (कडठझ) न बसविणार्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. दिनांक 30.11.2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी असं आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.




