राज ठाकरे सध्यातरी आमच्या आघाडीत नाहीत

रमेश चैनिथल्लांचे मविआबाबतही मोठं वक्तव्य

पुणे/12 ऑगस्ट : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने (चतअ) जोरदार निदर्शने करत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्याच पोर्शभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस (उेपसीशीी) पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे. या कार्यशाळेत बोलताना चैनिथला यांनी राज्यातील निवडणुकांबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, नसीम खान, विेशजित कदम, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. तर, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी दोन दिवसीय कार्यशाळेला दांडी मारल्याचं दिसून आलं. या कार्यशाळेत पदाधि कार्‍यांना मार्गदर्शन करताना चैनिथला यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषं गानेही संकेत दिले आहेत. निडणूक आयोग भाजपच्या हातात- निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे, ते म्हणतील तसेच होईल. मालेगावमध्ये बॉम्ब फोडले, त्यांना निर्दोष सोडले, पोलिसांनी त्यांना सोडून दिले. देशाचे स्वातंत्र वाचवण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत, ते स्वतःसाठी नाही. पण,निवडणूक आयोग त्यांना उत्तर देत नाही. आता, काँग्रेसने जनजागृती सुरू केली आहे. ब्लॉक कमिटींमध्ये आपण हे  सगळ काम लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. आपली विदेश नीती अपयशी ठरल्याने अमेरिका आपल्याला धमकी देते. काँग्रेस काळात कधी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अशी धमकी देत नव्हते, त्याला उत्तर दिलं जात होतं. पण, आता कोणीही उत्तर देत नाही, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणार्‍या टॅरिफ वादावरही चैनिथला यांनी मोदींवर निशाणा साधला.

 

संबंधित बातम्या

Back to top button