शाळेवर कोसळलं हवाई दलाचं जेट, 16 जणांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये भीषण विमान अपघात

ढाका / 21 जुलै : बांगलादेशमध्ये भीषण विमान अपघात झालाय. सोमवारी दुपारी ढाक्यातील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळलं आहे. या भीषण अपघातात अनेक जणांचा जीव गेल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जखमींना बचाव पथकांनी बाहेर काढलंय. घटनास्थळी पालक आणि नातेवाईक दाखल झाले आहेत.
ढाका येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटचे अधिकारी सैदूर रहमान यांनी बांगलादेशातील आघाडीच्या इंग्रजी दैनिक द डेली स्टारला सांगितले की, काही तासांतच मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघाताच्या वेळी उपस्थित नसलेली शाळेतील विद्यार्थिनी रफिका ताहा हिने असोसिएटेड प्रेसला फोनवरून सांगितले की, माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजमध्ये सुमारे 2000 विद्यार्थी आहेत. येथे प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. विमान कोसळलं तेव्हा काही विद्यार्थी परीक्षा देत होते तर काही नियमित वर्गात उपस्थित होते. सैन्य दल आणि अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ढाकाच्या उत्तर भागातील एका शाळेच्या आवारात बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले. अपघाताच्या वेळी मुले शाळेमध्ये उपस्थित होती. माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात हे विमान कोसळले आहे.
बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने एका संक्षिप्त निवेदनात पुष्टी केली की, पाडलेले ऋ-7 इॠख विमान हवाई दलाचे होते. अग्निशमन अधिकारी लिमा खान यांनी फोनवरून सांगितलं की किमान एकाचा मृत्यू झाला आणि इतर चार जण जखमी झाले आहेत, परंतु त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत.

संबंधित बातम्या

Back to top button