कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार
‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याने स्वीकारली जबाबदारी

-हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल केला
मुंबई / 10 जुलै: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कॅनडामध्ये असलेल्या त्यांच्या कॅफेवर गोळीबार झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डी याने स्वीकारली आहे. अलीकडेच कपिल शर्मा आणि त्यांची पत्नी गिन्नी यांनी या कॅफेचे उद्घाटन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रात्रीच्या वेळी गाडीत बसून कॅफेच्या खिडक्यांवर अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हल्लेखोरांनी किमान 9 फैरी झाडल्या.




