राजस्थानात जॅग्वार कोसळले, दोघांचा मृत्यु

जयपुर / 9 जुलै: राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावात बुधवारी जॅग्वार हे लढाऊ विमान कोसळले. विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबतचे गूढ वाढले आहे. या अपघातात पायलटसह दोघांचा मृत्यू झाला आहे. आकाश जोरदार स्फोट झाल्यानंतर विमान शेतात कोसळल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. हवाई दलाचे जॅग्वार हे लढाई विमान कोसळल्याने पुन्हा एकदा या विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे विमान नेमके कोणत्या कारणांमुळे कोसळेल, याचा तपास सुरू करण्यात आली आहे. विमानातील दोघांचे मृतदेह बाहर काढण्यात आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज आल्यानंतर विमान शेतात एका झाडावर कोसळले. हा संपूर्ण भाग वाळंवटी आहे.




