मनपा संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अमरावती/26 नोव्हेंबर : गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर,2026 रोजी संविधान दिवसा निमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता उपमहापौर सचिन भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस यावेळी हारार्पण करण्यात आले.
यावेळी अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, नगरसेवक संजय तिरथकर, संजय गव्हाळे, सचिन वैद्य, विनोद तानवैस, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नगरसचिव अक्षय निलंगे, उपअभियंता शरद तिनखेडे, हेमंत महाजन, आनंद काशिकर, अजय वाढोणकर, प्रमोद मोहोड, अमोल साकुरे, श्री काकडे, श्री बावीस्कर, गणेश काकडे, भुषण खडेकार, मंदार नानोटी, सतिश ताथोड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी संविधान दिनाच्या आधारीत गीत गायन सादरीकरण केले. यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभुषेत अभिनेता सर्जेराव गलपट उपस्थित होते.





