महिलांसाठी अमरावतीत मॅरेथॉन
29 पासून ऑनलाईन नोंदणी सुरु

* 10 आणि 5 किलोमीटरच्या गटात स्पर्धा
* 1 लाख 75 हजारांची बक्षिसे
अमरावती /26 नोव्हेंबर- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावतीत प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. 7 मार्च 2027 रोजी होणार्या या स्पर्धेत 10 आणि 5 किलोमीटर अशा दोन अंतरांच्या शर्यती रंगणार आहेत. स्पर्धेसाठी 1 लाख 75 हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, 29 नोव्हेंबर 2026 पासून नोंदणी सुरू होणार आहे. महिलांमध्ये आरोग्य, व्यायाम आणि धावण्याबाबत जागरूकता वाढवण्यासोबतच त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
अमरावती मॅरेथॉन असोसिएशन आणि अमरावती रोड रनर्स ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 आणि 5 किलोमीटरच्या दोन्ही शर्यतींसाठी 15 ते 40 वर्षे आणि 40 वर्षांवरील असे स्वतंत्र वयोगट असतील. प्रत्येक वयोगटातील पहिल्या 5 विजेत्यांना रोख बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व सहभागी महिलांना टी-शर्ट, पदक, पिशवी आणि अल्पोपाहार दिला जाईल. धावण्याच्या मार्गावर पाणी, ऊर्जा पेय आणि केळ्यांची व्यवस्था असेल. धावपटूंची वेळ नोंदवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वेळमापक चिप वापरण्यात येणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून होईल. इच्छुक महिलांना ुुुर्.ीीपराीर्रींरींळ.लेा/ीरज्ञहळ संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. जानेवारी 2027 पासून दर रविवारी सराव सत्रे होतील. दक्षिण आफ्रिकेतील 90 किलोमीटरची कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेल्या अमरावतीतील 4 महिला धावपटू स्पर्धेच्या प्रचारदूत असतील. अमरावती रोड रनर्स ग्रुपचे संस्थापक दिलीप पाटील यांनी महिलांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.





