मासोद येथे आई रुख्मिणीमातेच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत
विठ्ठल-रुख्मिणीच्या जयघोषात रिंगण, फुगडी आणि भजनांचा उत्साह

* गावात भक्तिमय वातावरण
अंजनगाव बारी/25 नोव्हेंबर : श्री विदर्भ कन्या आई रुख्मिणीमाता पालखी पायदळ दिंडी सोहळा श्री क्षेत्र बडनेरा ते श्री क्षेत्र कौंडण्यपूर या मार्गावर सुरू असून, या पालखीचे 21 नोव्हेंबर 2026 रोजी एकादशीच्या पावन पर्वावर मासोद येथील गिरीश हरिश्चंद्र चौधरी यांच्या निवासस्थानी आगमन झाले. यावेळी पालखीचे ग्रामस्थांच्यावतीने उत्साहात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
दुसर्या दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी गावातून भव्य पायदळ दिंडी काढण्यात आली. गावातील प्रत्येक चौकात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महिला व पुरुषांनी फुगडी खेळत, भजन आणि विठ्ठल-रुख्मिणीच्या जयघोषात भक्तिरसाचा आनंद घेतला. संपूर्ण गावात उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. एकादशीनिमित्त आदल्या दिवशी भाविकांना साबुदाणा खिचडी व मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले. तसेच गावकर्यांच्या वतीने सामूहिक नाश्त्याची व्यवस्था करून पालखी सोहळ्यातील वारकर्यांचा पाहुणचार करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी हार्ट हॉस्पिटल मार्गे परसोडाकडे मार्गस्थ झाली. या संपूर्ण सोहळ्याच्या स्वागत व आयोजनासाठी , पालखी निघते अशा सुचिता अनिल वणवे ताई, गिरीश चौधरी शुभम मसराम, अक्षय कुंभरे, नितीन बावणे, शैलेश तलहांडे, आकाश सयाम, आकाश गवळी, वेदांत बोरकर, रोहित कातलाम, कार्तिक कटलाम, जयश्री गिरीश चौधरी, हरीष चौधरी, सोनाली चौधरी, वैभव नंदनवर, समर्थ बोरकर, खंदारे बंधू, केवतकर बंधू, गवळी बंधू, अभिषेक उमप, सोनू पाठक, आशिष धर्माल, अविनाश मसराम, अविनाश मालठाणे, चांभारे बंधू, कालबाडे बंधू, संजय गावडे यांच्यासह गावातील महिला मंडळ, पुरुष मंडळ, भजन मंडळ, गणेश मंडळ, दुर्गादेवी मंडळ, युवक मंडळी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गावकर्यांच्या एकजुटीने आणि सामूहिक सहकार्याने पार पडलेल्या या पालखी सोहळ्याने मासोद गावात भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला.





