जमिनीवरील निवासी अतिक्रमणे कायदेशीर करून नागरिकांना हक्काचे पट्टे

19 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान अर्ज करण्याची सुवर्णसंधी

पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी एकही रुपया लागणार नाही

अमरावती/20 नोव्हेंबर – अमरावती महापालिका हद्दीतील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे कायदेशीर करून नागरिकांना हक्काचे पट्टे देण्यासाठी महापालिकेचे नवे संगणकीय दालन सुरू झाले असून 19 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान घरबसल्या अर्ज करता येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 25 मार्चच्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीची केवळ स्वतःच्या राहण्याची अतिक्रमणे या योजनेत पात्र ठरणार आहेत. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते या नव्या प्रणालीचे उद्घाटन झाले. नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने अर्ज भरावेत असे आवाहन त्यांनी केले. या योजनेत पाचशे चौरस फुटांपर्यंतची जागा मोफत कायदेशीर होईल तर त्यापुढील दीड हजार चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी बाजारभावाच्या दहा टक्के रक्कम भरावी लागेल. घराच्या भागात लहान दुकान किंवा गिरणी असल्यास पंचवीस टक्के दर लागू राहील. अर्जासोबत 2011 पूर्वीचे वीज किंवा पाणी देयक, मतदार यादीतील नाव, चालू वर्षाची घरपट्टी पावती, कुटुंबाचे आधार कार्ड व स्वयंघोषणापत्र जोडावे लागेल. मात्र नदीपात्र, नाले, रस्ते, वनजमीन आणि आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे यात ग्राह्य धरली जाणार नाहीत. एका कुटुंबाला राज्यात एकदाच हा लाभ मिळेल आणि पुढील पाच वर्षे ही जागा विकता येणार नाही. या उद्घाटनप्रसंगी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, ईस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, खाँ आसिया अंजुम वहिद, विधी समिती सभापती स्नेहा आशिष लुल्ला, उपसभापती डॉ. मधुरा मिलिंद कहाळे, शहर सुधार सभापती राधा राजू कुरील, उपसभापती सुमती विजय ढोके, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती प्रिती हर्षल रेवणे, उपसभापती वंदना प्रदीप मडघे, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता संदिप आवारे, उपसभापती लता रावसाहेब देशमुख, नगरसेविका कल्याणी तायडे, मिनल सवाई, सुरेखा लुंगारे, अनिता काळे, लुबना तनवीर सैय्यद मखदुम, फरहा नाज सय्यद मिर अहद अली, कुबरा बानो करामत अली, सुनिता लोणारे, राजश्री जटाळे, रेखा तायवाडे, पुजा अग्रवाल, सोनाली नाईक, मालता गवई, डॉ. अर्चना आत्राम, अस्मा फिरोज खान, पंचफुला चव्हाण, अर्चना पाटील, विद्या माटे, नुतन भुजाडे, स्मिता सुर्यवंशी, लविना हर्षे, सुनिता भेले, ललिता रतावा, शाह अफसर जहा सादिक, शाह बीबी बतुल ताहेर, मरियम बानो मोहम्मद ईस्माईल रारानी, अर्चना पांडे, प्रियंका पाटणे, नंदा सावदे, पद्मजा कौंडण्य, मंजुषा जाधव, शारदा खोंडे, मिरा कांबळे, नुजहत परवीन शाकीर हुसैन, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, नगरसेवक बबलू शेखावत, चंदु खेडकर, गुड्डू धर्माळे, विनोद तानवैस, प्रमोद महल्ले, प्रशांत महल्ले, ऋषिकेश देशमुख, अहेमद शाह इकबाल शाह, सलाहुद्दीन करामोद्दीन, धीरज हिवसे, संजय नरवणे, दिपक साहू सम्राट, मनिष बजाज, विक्की वानखडे, मंगेश मनोहरे, सचिन वैद्य, प्रदीप हिवसे, रतन तेंडुलो, डॉ. संजय शिरभाते, सैय्यद राशद अली सैय्यद शौकत अली, शेख जफर शेख जब्बार, मोहम्मद रेहान मोहमद यासीन, योगेश विजयकर, आशिष अतकरे, प्रा. प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, संजय गव्हाळे, नजीब खान करीम खान, अजय जयस्वाल, ड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, दिनेश बुब, मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल, संजय हिंगामपुरे, भोजराज काळे, सैय्यद मुनज्जर अली, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भाग्यश्री बोरेकर व अधिकारी उपस्थित होते.

पाच वर्षे जागा विक्रीस सक्त मनाई

या योजनेतून कायदेशीर झालेली जागा पुढील पाच वर्षे विकता येणार नाही किंवा भाड्याने देता येणार नाही. अर्जात खोटी माहिती आढळल्यास अर्ज थेट रद्द केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी अचूक कागदपत्रांसह विहित मुदतीतच अर्ज दाखल करावेत.

Back to top button