रोहित पवारांनी मफलरमॅनचा फोटो दाखवला
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

* अमेरिकेतल्या एजन्सीकडून माहिती मिळवल्याचा दावा
मुंबई /16 नोव्हेंबर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेबाबत महत्त्वाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी व्ही. एस. आर . कंपनीच्या मालकांबाबत धक्कादायक आणि गंभीर दावे केले आहेत. व्ही. एस. आर. ही तीच विमान कंपनी आहे, ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. रोहित पवारांनी व्ही. एस. आर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह आणि त्यांच्या दोन पुत्रांबाबत धक्कादायक दावे करत गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी मफलरमॅन म्हणून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला आहे.
रोहित पवार यांनी यावेळी व्ही. एस. आर. कंपनीचे देशाबाहेरील संपत्ती आणि गुन्हेगारी संबंध असल्याचा दावा केला. व्हीएसआर असं कोण लागून गेलं की त्याला वाचवलं जातंय? तर त्याच्याजवळ पैसा आहे. हा पैसा कसा आहे? ते तुम्हाला दाखवून देतो, असं म्हणत रोहित पवारांनी प्रेजेन्टेशन सादर केलं. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांचे पुत्र राहुल सिंह यांच्याकडे गोल्डन विझा आहे. त्यांची दुबईमध्ये एक कंपनी रजिस्टर्ड आहे. तिथे त्याने दोन विमानं घेतली. ग्लोबल 500 हे विमान दीडशे कोटीचं आहे. हे विमान हैदराबादची एक कंपनी आहे, विश्वसमुद्र हे तिथे असणार्या मुख्यमंत्र्यांच्या फार जवळची कंपनी आहे. त्याचं हे विमान आहे. वीएसआरचा मालक राहुल सिंहचा गोल्डन विझा मी दाखवलेला आहे. कोट्यवधींच्या गाड्या व्ही. के. सिंह, राहुल सिंह, रोहित सिंह यांच्या असून त्या अमेरिकेत आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला.अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये 18 कोटींचं सुंदर घर विकत घेण्यात आलं. हे घर घेवरज्ञ इश्ररलज्ञ याच्याकडून विकत घेतलं. हा त्यांचा अमेरिकेतला भागीदार आहे. तो अमेरिकेतला एक गायक आहे. कोडॅक ब्लॅक या महाशयाने ड्रग्ज विकलं आहे. ड्रग्ज विकण्याबद्दल त्याच्यावर मे महिन्यात कारवाई झाली होती. त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा ड्रग्ज विकल्याच्या विविध बातम्या आहेत. कोडॅक ब्लॅककडून रोहित सिंह आणि व्ही के सिंह कडून विकत घेतलं आहे, असा दावा रोहित पवारांनी केला.





