एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाची भीती?
शिवकोष शिवसेना विेशस्त संस्थेची स्थापना

*राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव
*राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई / 1 जुलै: एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना तर फुटलीच त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही ठाकरेंच्या हातून निसटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सातत्यानं धक्क्यावर धक्के दिले. पण आता याच शिंदेंना त्यांच्याशिवसेनेत बंडाची भीती वाटू लागली की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण त्यांनी काही सावध पण मोठी पावले उचलली आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांपूर्वी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. तसेच यातील एका ठरावाची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत शिवकोष शिवसेना विेशस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या संस्थेच्या अंतर्गत शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालयं आणि शाखा येणार आहे. त्यांचं व्यवस्थापन विेशस्त संस्थेकडून पाहिलं जाणार आहे. शिवकोष शिवसेना विेशस्त संस्थेकडूनच पक्षनिधी, गरजवंताना मदत, पक्षाच्या वतीनं केल्या जाणार्या इतर कार्यक्रम ठरवण्यात येतील. याच संस्थेकडून शिवसेनेशी संबंधित समाजपयोगी, लोकोपयोगी कामांचंही नियोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदेच्या बंडाचा सगळ्यात मोठे नुकसान उद्धव ठाकरेंना सहन करावा लागला हाते ज्यावेळी बागुतांश उद्धव ठाकरेंची साथ सोडत खासदार, आमदार, नगरसवे क, पदाधिकारी, नेते कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसने ते प्रवशे केला.




