आजपासून सर्व सामान्यांच्या खिशावर येणार भार!

जीएसटी रिटर्नमध्येही नियम कठोर

-अनेक क्षेत्रात नियम बदलणार
-पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य
नवी दिल्ली/ 30 जून : 1 जुलै 2025 पासून अनेक नवीन आर्थिक नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, 1 जुलैपासून कोणते नवीन नियम लागू होणार आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये युपीआय चार्जबॅक, नवीन तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग आणि पॅन कार्ड नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.
नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी 1 जुलैपासून आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यापूर्वी, तुम्ही कोणत्याही वैध कागदपत्राद्वारे किंवा जन्म प्रमाणपत्राद्वारे पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत होता. जुलै 2025 पासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी अनेक नवीन नियम लागू होतील. 1 जुलै 2025 पासून, आयआरसीटीसी वेबसाइट किंवा त्यांच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे तत्काळ ट्रेन तिकिटांसाठी आधार पडताळणी अनिवार्य असेल. आतापर्यंत कोणत्याही व्यवहारावरील चार्जबॅक दावा नाकारला गेला तर बँकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेतल्यानंतर केस पुन्हा सुरु करावी लागत होती. परंतु 20 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नवीन नियमानुसार, बँका आता एनपीसीआयच्या मंजुरीची वाट न पाहता स्वतःहून चार्जबॅक दावे पुन्हा प्रक्रिया करू शकतात. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
जीएसटी नेटवर्कने जाहीर केले आहे की जुलै 2025 पासून जीएसटीआर-3बी फॉर्म एडिट करता येणार नाही. याशिवाय आता कोणताही करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा जीएसटी रिटर्न भरू शकणार नाही.
-रेल्वे भाडे वाढणार
भारतीय रेल्वे 1 जुलैपासून प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ करणार आहे. रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून बदल करण्यात येत आहेत. 1 जुलै 2025 पासून हे बदल होणार आहेत. यातील एक रेल्वेकडून तात्काळ तिकिटांच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गंत आता 1 जुलैपासून आधार व्हेरिफाइड युजर्सही आयआरसीटीसी वेबसाइट किंवा पवर तत्काळ तिकीट बुक करू शकणार आहेत. या बदलाबरोबर रेल्वे 1 जुलैपासून रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करू शकतात. नॉनएसी मेल, एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकिटात 1 पैसे प्रति किमी आहेत. तर एसी क्लासमध्ये 2 पैसे प्रति किमी वाढ करण्यात येऊ शकते. 500 किमीपर्यंतच्या प्रवासासाठीच ही दरवाढ असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button