दुष्काळामुळे राज्यातील कुठलीही सरकारी योजना बंद होणार नाही
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

नागपूर /19 ऑक्टोबर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारी योजनांना कात्री लावली जाणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. केवळ योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा करून अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. त्यातून वाचणारा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरणे हा सरकारचा उद्देश असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दुष्काळ निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. दुष्काळी उपाययोजनांवर अधिक प्रभावीपणे खर्च करण्यासाठी काटकसर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विकासासाठी एखाद्या रस्त्याचे काम काही काळ पुढे ढकलावे लागले, तरी चालेल; मात्र शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही. शेतकर्यांना मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. चारा आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील. जलसंधारण, पाणीसाठा वाढविणे आणि जुन्या विहिरींचे पुनर्विकास यावर सरकार भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांना धमक्या देणार्यांची चौकशी करणार- अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान न केल्यास शिक्षकांना नोकरीतून काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या तक्रारींची योग्य वेळी चौकशी करण्यात येईल. शिक्षकांना धमकावून मतदान मिळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. संस्थेच्या नावाखाली काही व्यक्ती गैरवापर करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी माझ्या बोलण्यात कुठल्याही संस्थेचे नाव घेतले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर पदवीधर मतदारसंघासह महाराष्ट्रातील पाचही विधान परिषद जागांवर महायुतीचा विजय होईल. नागपूर पदवीधर मतदारांना सुधाकर कोहळे यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवता येतील आणि ते सोडवले जातील, अशी अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत संदीप जोशी यांना पराभूत करण्यासाठी सत्तेचा गैरवापर आणि जातीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केल





