राणा दांपत्याची शेकडो भक्तांसह अनवाणी पदयात्रा

सर्वसामान्यांच्या सुखासाठी देवीच्या चरणी साकडे

अमरावती /19 ऑक्टोबर  : नवरात्रीच्या पावन पर्वावर अमरावतीचे श्रद्धास्थान असलेल्या आई अंबादेवी आणि आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आमदार रवी राणा व भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी शेकडो भाविकांच्या साथीने शंकर नगर ते मंदिरापर्यंत अनवाणी पायी पदयात्रा काढली. ’जय माता दी’च्या गजराने आणि भक्तीच्या रंगात रंगून गेलेला पूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या पदयात्रेदरम्यान राजापेठ चौकातील मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण एका सामान्य फूलविक्रेत्याच्या हाताने करून राणा दांपत्याने सर्वसामान्य जनतेप्रति आपला आदर व आपुलकी व्यक्त केली.
मंदिरात पोहोचल्यावर दोन्ही नेत्यांनी देवीची भावपूर्ण महाआरती केली. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या बळीराजाला या संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट व्हावेत, तसेच शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि तमाम नागरिकांच्या घरात सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी कळकळीची प्रार्थना त्यांनी अंबामातेच्या चरणी केली.या मंगलप्रसंगी मंदिरातील सेवेकरी महिला भगिनींचा नवनीत राणा यांच्या हस्ते साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला, तर संस्थानच्या वतीने राणा दांपत्याचा विशेष सत्कार झाला. या धार्मिक सोहळ्यात विलास मराठे, सुरेंद्र बुरंगे, चंद्रशेखर कुलकर्णी, शरद गडीकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, महानगरप्रमुख नितीन बोरेकर, शहराध्यक्ष राजा बांगडे, विनोद जायस्वाल, जयंतराव वानखडे, ज्योती सैरीसे, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती प्रीती रेवणे, नगरसेवक प्रशांत वानखडे, नगरसेविका सुमती ढोके, राधा कुरील, संजय तीर्थकर, अजय जयस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, मीरा कांबळे, पीयूष बुंदेले, अंकुश ठाकरे, नीरज गवई यांच्यासह प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button