दर्यापुरच्या उपविभागीय कार्यालयात घुसून आंदोलकांची तोडफोड
शेतकर्यांना पन्नास हजार द्या अन्यथा गाठ आमच्याशी

पाच हजारांची मदत फेकत दर्यापुरात उद्रेक
संपूर्ण कर्जमाफीशिवाय माघार नाहीच
दर्यापूर /19 ऑक्टोबर – दुष्काळात होरपळणार्या बळीराजाच्या तोंडाला अवघे पाच हजार रुपये पाने पुसणार्या निर्दयी शासनाविरोधात दर्यापुरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा संतापाचा महाभडका उडाला. एकरी 50 हजार रुपये मदत, शेतमजुरांना 25 हजार रुपये आणि सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलकांनी उपविभागीय कार्यालयात थेट घुसून प्लास्टिकच्या कुंड्यांची तोडफोड करत प्रशासनाचा तीव्र धिक्कार केला.
निसर्गाच्या लहरीपणाने शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर करपून खाक झाल्याने शेतकरी पार उद्ध्वस्त झाला आहे. बी-बियाणे आणि खतांचा खर्चही भरून न निघणार्या परिस्थितीत पाच हजार रुपयांची तुटपुंजी भीक देऊन शासन शेतकर्यांची थट्टा उडवत असल्याचा घणाघात आंदोलकांनी केला. सरसकट कर्जमाफी करा, शेतीपंपांची वीज तोडणे तत्काळ थांबवा आणि जनावरांच्या चार्याचीसोय लावा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा थेट इशारा देत आंदोलकांनी दर्यापूर दणाणून सोडले. अचानक उसळलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची व पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली.
या रणकंदनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अभय पाटील गावंडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव अनिकेत वाकपांजर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील कवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, काँग्रेसचे सरचिटणीस नितेशभाऊ वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंदुभाऊ रायबोले, बबनराव विल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गुड्डू पटेल, काँग्रेसचे शहराध्यक्ष अतिश शिरभाते, ओमप्रकाश कुटेमाटे, भारत आठवले, दीपक बागडे, सागर गिर्हे, राजेंद्र पाटील वडाळ, पार्थ लोढम, अशोक पाटील कोकाटे, विजय चौरपगार, प्रशांत गावंडे, आसिफ भाई, बाबुलाल राऊत, अमित होले, राजाभाऊ तराळ, भूषण जंगले, अजय देशमुख, नितीन गाडे, रसूल शाह, शेतकरी संघटनेचे सुनील पाटील साबळे, विष्णुभाऊ काळमेघ, सुधीर पवित्रकर, गणेशराव अरबट, संजय हाडोळे, बबनराव देशमुख, जगदीश कांबळे, सचिन साळवे, संजय पांचबुडे, सुधीर लोढम, गुड्डू लोढम, नमित हुटके यांच्यासह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.





