श्री अंबादेवी मंदिरात भक्तिमय वातावरणात भजन गायन

सखी महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त

अमरावती /18 ऑक्टोबर  : अमरावती शहरातील न्यू प्रभात कॉलनी येथील सखी महिला मंडळाच्यावतीने यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून विदर्भाचे आराध्य दैवत अंबादेवी मंदिर येथे सकाळी भावपूर्ण वातावरणात भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या महिलांनी देवीच्या विविध स्तुतीपर रचना, आरत्या आणि पारंपरिक भजनांचे सुश्राव्य सादरीकरण केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी गायलेल्या भक्तीगीतांमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही या भजनांचा आनंद घेत देवी चरणी नतमस्तक होऊन समाधान व्यक्त केले. या भक्तिमय उपक्रमात सखी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्या ममता चुंगडा, स्वाती लांडे, संगीता तट्टे, नीलिमा अकोटकर, वर्षा देशमुख, नीलिमा चव्हाण, लिना जगताप, शर्मिला मिश्रा, चंदा नवाथे, वंदना सदार, नीलिमा देशमुख, रेडकर तसेच निशाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button