मतचोरीची किंमत चुकवावी लागेल
राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी, शहांना इशारा

नवी दिल्ली/18 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी पडद्यामागून मतचोरीची योजना आखतात. ती योजना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यान्वित करतात. तर, अंमलबजावणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार करतात. त्यांना मतचोरीची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी दिला. गोव्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या राजकीय रणसंग्रामाच्या पार्श्वीभूमीवर काँग्रेसने जवळपास महिनाभर चालणारी गोवा रक्षण यात्रा काढली. यात्रेचा समारोप मडगांवमधील सभेने झाला. त्यावेळी राहुल बोलत होते. त्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक भूमिका मांडली.





