किरण सरनाईक यांच्या भूमिकेमुळे महायुतीत मतभेद

खासदार, आमदारांना डावलल्याने मित्रपक्षांमध्ये तीव्र नाराजी

मंत्री उदय सामंतांच्या आवाहनानंतरही बंडखोरीचे आव्हान कायम

अमरावती/15 ऑक्टोबर – अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किरण सरनाईक यांच्या मनमानी कारभारामुळे घटक पक्षांमध्ये प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. विभागातील पाच जिल्ह्यांत महायुतीचे तब्बल 3 खासदार आणि 23 आमदार असताना उमेदवाराने साधी विचारपूसही केली नसल्याने भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संताप आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी प्रा. श्रीकांत देशपांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांची बंडखोरी कायम राहिल्याने महायुतीसमोर मोठे पेच निर्माण झाले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या आखाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किरण सरनाईक यांना पुन्हा रिंगणात उतरवले. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरवण्यापर्यंत त्यांनी मित्रपक्षांच्या लोकप्रतिनिधींना पूर्णपणे वार्‍यावर सोडल्याचे उघड झाले आहे. अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांत महायुतीचे 22 आणि राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवी राणा यांना धरून 23 आमदार आहेत. तरीही आ. सरनाईक यांनी एकाही नेत्याशी साधा दूरध्वनीवरून संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.
स्वतःच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते आ. बच्चू कडू, विधान परिषद सदस्य भावना गवळी तसेच केंद्रीय राज्यमंत्री खा. प्रतापराव जाधव यांच्याशीही त्यांनी कोणताही संपर्क केला नाही. एका बाजूला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत धाव घेऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, तर दुसर्‍या बाजूला उमेदवाराच्या या हेकेखोर वृत्तीमुळे गावपातळीवरील कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. अशा थंड आणि एकतर्फी कारभारामुळे संपूर्ण पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांपर्यंत महायुतीची यंत्रणा कशी पोहोचणार, असा गंभीर सवाल आता उभा राहिला आहे.
अमरावती जिल्ह्यात तर या वादाची ठिणगी जोरदार पडली आहे. येथे भाजपचे राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह 7 विधानसभा आणि 3 विधान परिषद सदस्य कार्यरत आहेत. उमेदवाराने साधे तोंडही न दाखवल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका विधान

Back to top button