एकनाथ शिंदे नाराज झाले तर मोठा स्फोट होईल

आ.बच्चू कडू यांचे वक्तव्य

मुंबई /13 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दुष्काळाच्या बैठकीला आणि सोमवारी (12 ऑक्टोबर) वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याआधी शिंदे गटाच्या दोन नेत्यांची एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य चर्चेत आली होती. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, एकनाथ शिंदे नाराज होत नाहीत. मला माहीत आहे, ते सदाबहार आहेत. त्यामुळे कुणीही त्याची चिंता करू नये. पण ते जर नाराज झाले, तर स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांना कोणीही नाराज करू नये, एवढीच माझी विनंती आहे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

Back to top button