ऐन दुष्काळात राज्य सरकार खरेदी करणार 32 इनोव्हासह 44 नवीन वाहने

मुंबई/13 ऑक्टोबर :  सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा कोरडा गेला आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके करपून गेली आहेत. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या तोंडावर आहे.
मात्र, राज्य सरकारकारने व्हीआयपी अतिथींसाठी नव्या वाहनांच्या खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. तब्बल12.68 कोटी रुपयांच्या 44 वाहन खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यात सगळ्यात महागडी गाडी चार कोटी रुपयांची आहे. या निर्णयामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुष्काळातही राज्य सरकारची वाहन खरेदी थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. यात व्हीआयपी पाहुण्यांसाठी तब्बल चार कोटींची एक लँड क्रूजरची खरेदी करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये खर्च वाचवा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असतानाही वाहने खरेदीस मंजुरी दिल्याने टीका होत आहे.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा – 32 वाहने
टोयोटा फॉर्च्युनर – 2 वाहने
टोयोटा लँड क्रुझर 300 – 1 वाहन
मारुती सुझुकी एर्टिगा – 7 वाहने
टोईंग वाहन – 1 वाहन
अर्बानिया बस – 1 वाहन

Back to top button