आघाडीच्या तडजोडीमुळे काँग्रेसने किंमत चुकविली

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

अलिबाग / 29 जून: आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. ते अलिबाग येथे युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात आज युत्या आघाड्यांची अपरिहार्यता आहे. पण या युती आणि आघाडीची किमंत काँग्रेस पक्षाचा चूकवावी लागली आहे. क्षमता असूनही पक्षाला निवडणुका स्वबळावर लढवता आल्या नाहीत. पक्षाला योग्य पध्दतीने संधी मिळू शकली नाही. हे वास्तव आहे. पण आगामी काळात यात गुणात्मक बदल कसे करता येतील यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे काम पक्षाने सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबाबत जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कधी होतील याबाबत अजून स्पष्टता नाही. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणूका आम्ही लढलो. आज देखील आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी कटीबध्द आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये आघाडी करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा आणि तालुका कमिट्यांकडे असणार आहे. याची पूर्व कल्पना आम्ही मित्रपक्षांना दिली आहे. या निवडणूकांची तयारी करण्यासाठी आम्ही निरीक्षक नेमले आहे. जिल्हा आणि तालुका कमिट्या जो निर्णय घेतील त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश पातळीवरून केले जाईल. असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button