हिशोबात राहुन बोला… हा माज बरा नाही
लोणीकरांना यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

अमरावती / 27 जून : तुमच्या माय बापाचे पेन्शन, या लोणीकरने सुरू केली. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदी सरकार सहा हजार रुपये देते. तुझी बहीण, बायको, आई यांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये लोणीकरमुळे मिळतात, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून माजी मंत्री, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हा कशाचा माज? असे म्हणत लोणीकरांवर हल्लाबोल केला आहे.
ठाकूर म्हणाल्या आहेत की, भाजप आमदार बबनराव लोणीकर हे मायबाप शेतकरी यांच्या घरचा नोकर असल्यासारखं बोलत आहेत. शेतकर्याला जसं आपल्या खिशातून सगळं देतायत तसं या मंडळींचं बेताल बोलणं आहे. लोणीकर, शेतकरी हा कोणाच्या बापाचा नोकर नाही. तुम्ही त्यांचे नोकर आहात हे लक्षात ठेवा आणि हिशोबात राहून बोला! भाजप आणि त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनीही हे लक्षात ठेवावं. तुम्हाला आश्वासन देऊनही शेतकर्याचं कर्ज माफ करता येत नाहीय. राग शेतकर्यावर काढू नका. आणि तोंड सांभाळून बोला. तुमचा माज उतरवायला वेळ लागणार नाही, असा इशाराही ठाकूर यांनी ट्विट करत दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील लोणीकर यांच्या टीका केली. ते म्हणाले,भाजपची सत्ता म्हणजे जणू हुकूमशाहीच.लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने जनतेशी संवाद साधायचा असतो, दबाव टाकायचा नसतो. पण भाजप आमदार लोणीकर ज्या पद्धतीने सत्तेचा माज दाखवत आहेत, ते पाहता ही फक्त सत्ता नाही वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या बबनराव लोणीकरांनी आपण हे वक्तव्य स्थानिक राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोललो होतो. यामध्ये शेतकर्यांच्या अपमान करण्याचा हेतू नव्हता. विरोधकांचे कामच काय आहे ते सगळ्यालाच विरोध करतात. त्यांनी काय काम केले हे दाखवून द्यावे, असे म्हणत लोणीकरांनी माफी मागण्यास नकार दिला.




