वाघाचा हल्ला; मुलीच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण

पोर्ला शिवारातील घटना

गडचिरोली/13 सप्टेंबर : शेतात कापूस पिकावर फवारणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकर्‍यावर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पोर्ला येथे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. मुलीने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरडीमुळे शेतकर्‍याचे प्राण सुदैवाने वाचले असून, या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले आहेत. भाऊराव म्हशाखेत्री (वय 50, रा. पोर्ला) असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. भाऊराव म्हशाखेत्री हे रविवारी सकाळी आपल्या शेतात कापूस पिकावर औषध फवारणीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही शेतात हजर होती. फवारणी करत असतानाच ते विश्रांती घेण्यासाठी शेतात बसून होते. दरम्यान सकाळी 11 च्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने भाऊराव यांच्यावर झेप घेतली.

Back to top button