आज पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्हा दौर्यावर
जलसंधारण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती

यूथ फेस्टिव्हलसह विद्युत अभियंता अधिवेशनालाही लावणार हजेरी
अमरावती/ 20 ऑगस्ट : महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी (21 ऑगस्ट) अमरावती जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते नागपूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 6 वाजता नागपूर येथील लेडीज क्लब लॉनजवळ जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकॅथॉन’ कार्यक्रमाला बावनकुळे उपस्थित राहतील. याच दिवशी अमरावतीतील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पंचवटी चौकात माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण विभागातर्फे वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता सकाळी 11 वाजता विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) संदर्भातील कार्यक्रमासाठी ते अमरावतीकडे रवाना होतील. मोटार मार्गाने सुमारे 156 किलोमीटरचा प्रवास करून ते अमरावतीत दाखलहोतील. सायंकाळी 5 वाजता शेगाव नाका परिसरातील अभियंता भवन येथे ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’तर्फे आयोजित 41 व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सायन्स कोर मैदानावर नवराष्ट्र यूथ फाउंडेशनतर्फे आयोजित तीन दिवसीय ‘अमरावती यूथ फेस्टिव्हल 2026’ या सांस्कृतिक व सामाजिक युवा महोत्सवाला ते भेट देतील. सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासाठी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दौरा पूर्ण झाल्यानंतर सोयीनुसार सुमारे 155 किलोमीटरचा प्रवास करून बावनकुळे मोटारीने नागपूरकडे रवाना होणार आहेत.




