E 20 वरील डीपफेक व्हिडीओ प्रकरणात गडकरींना दिलासा

मेटा-गुगलविरुद्ध खटला दाखल करण्याची हायकोर्टाची परवानगी

मुंबई/27 जुलै- मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (27 जुलै) एका महत्त्वपूर्ण आदेशात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मेटा, एक्स आणि गुगल यांच्यासह अनेक सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. हे प्रकरण इथेनॉल-मिश्रित इंधनाबाबत (ए 20) सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या कथित एआय निर्मित डीपफेक व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्‍या डिजिटल मजकुराशी संबंधित आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, गडकरींनी त्यांच्याविरुद्धचा सर्व कथित बदनामीकारक मजकूर सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, या पोस्ट आणि व्हिडिओंद्वारे त्यांना इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रम आणि ए 20 उपक्रमाशी खोट्या पद्धतीने जोडले जात आहे, तर या योजना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत चालवल्या जातात आणि त्यात त्यांची कोणतीहीवैयक्तिक भूमिका नाही. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकल खंडपीठासमोर झाली. ज्येष्ठ वकील संदीप एस. लढा यांनी गडकरींच्यावतीने युक्तिवाद सादर केला

संबंधित बातम्या

Back to top button