SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने फटकारले

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का

नवी दिल्ली/24 जुलै -दिल्ली उच्च न्यायालयाने डखठ ड्युटीसाठी शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला फटकारले. कलम 324 च्या अधिकाराचा गैरवापर होत आहे का, असा सवाल उपस्थित करत शिक्षकांच्या हक्कांवरही न्यायालयाने भाष्य केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने डखठ च्या ड्युटीसाठी शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी निवडणुका आयोगाला चांगलेच फटकारले आहे. राज्यातील शाळेतील शिक्षकांना मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनाच्या कामासाठी का लावले, असा सवाल न्यायालयाने केला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने विचारले की, संविधानातील कलम 324 चा वापर करून निवडणूक आयोग मनमानी कारभार करू शकतो का? या कलमाच्या नावाखाली तुम्ही काहीही करू शकता का? मानधन किंवा अधिक पैसे देण्याचा मुद्दा महत्वाचा नाही. या सगळ्याची खरोखरच आवश्यकता आहे का? केवळ मोबदला देतो म्हणून शिक्षकांना सुट्ट्यांमध्ये काम करण्यास भाग पाडणार का? त्यांना विश्रांतीची गरज नाही का? न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले की, कोणत्या अधिकाराखाली शिक्षकांना डखठ कामासाठी नियुक्त केले जाते, विशेषतः जेव्हा शिक्षकांनी या हे काम करण्यास नकार दिला तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करत आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने वकील संजय वाशिष्ठ यांनी सांगितले की, दिल्लीतील डखठ प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे आणि फक्त 10 ते 14 टक्के शिक्षकांनाच या कामासाठी बोलावले गेले होते. त्यांनी ’ठशिीशीशपींरींळेप जष ढहश झशेश्रिश -लीं’ च्या कलम 13इ(2) अंतर्गत आयोगाला कर्मचार्‍यांना कामावर लावण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने नमूद केले की, आयोग जरी या कामाला ’स्वेच्छा’ म्हणत असला तरी प्रत्यक्षात शिक्षकांकडे नकार देण्याचा पर्याय नसतो. असे न्यायालयाने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button