यादी जाहीर; केवळ 553 शेतकर्यांना कर्जमाफी
पहिल्या टप्प्याच्या यादीवरुन असंतोष

तांत्रिक अडचणींमुळे विलंब-सहकार मंत्री
मुंबई /22 जुलै : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज (22 जुलै) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा मुहूर्त गाठताना पहिल्या यादीत 0.1 टक्क्याहून कमी शेतकरी लाभार्थी ठरले असून पहिल्या यादीत केवळ 533 शेतकर्यांचा समावेश आहे. बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिली की, लाडकी बहीण योजनेप्रमाणे शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अपात्र शेतकर्यांना लाभ मिळू नये म्हणून सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत प्राप्तिकर भरणार्या शेतकर्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडून मागवली आहे. मात्र, विभागाकडून करदाते शेतकर्यांची माहिती अद्याप प्राप्त न झाल्याने पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या 533 पात्र शेतकर्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. या लाभार्थ्यांना एकूण 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपये कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून माहिती मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून ती प्राप्त होताच उर्वरित पात्र शेतकर्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे. ही योजना म्हणजे केवळ कर्जमाफी नसून शेतकर्यांना कर्जमुक्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमुक्ती झाली नसल्याचा दावा करत, कर्जमुक्तीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे




